Login
Login page
Simple Login Page
मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०११
रविवार, २३ ऑक्टोबर, २०११
बंगला व झोपडी
बंगला व झोपडी ,
बंगल्यात आज त्या
पैशाची उधळण होत आहे,
बंगल्याच्या बगलातल्या झोपडीत ,
चूल पेटवायालाही सरपण नाही,
बंगल्यात त्या जवळच्या ,
मद्याच्या पेल्यांचा खणखणाट,
करकरत्या झोपडीत मात्र ,
बासन कोरडीठाक पडलेली ,
बंगल्यातल्या कुत्र्यांनाही
उच्च दर्जाची बिस्कुट,
झोपडीत मात्र अंथरुणात
पोटात भुकेचे तांडव ,
बंगल्यात कुणाच्या ,
पिऊन हसतांना डोळ्यात पाणी ,
झोपडीत मात्र कुणी मूकपणे
अलगद अश्रू ढळणार ,
बंगल्यातल जागरण ,
ते फक्त शौकान,
झोपडीतल जागरण मात्र,
पोटातल्या भुकेन
पोटातल्या भुकेन
फिरोज मिर्झा ....
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)