Login

Login page

Simple Login Page

Username Password

शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१२

एक विचार

·         उपास-तापास, नवस आणि जागरणांचासीझनआहे. जो तो देवाला खूश करायच्या मागे लागला आहे. कुणी बाबांच्या वाऱ्या करतात, तर कुणी दर्शनाचा अतिरेक करतात. उपासाच्या नावाखाली पोट फाटेस्तोवर उपासाचे पदार्थ खाल्ले जातात. जागृत मानल्या जाणाऱ्या स्थळांवर मोठमोठे नवस मागितले जातात. आवडीच्या गोष्टी सोडणे, मंदिरांना दान देणे, आठवड्यात एक चक्कर टाकणे हे सर्वही त्याचबरोबर सुरू होते. या सर्वांचे कारण एकच - ’स्वार्थ’. काहीतरी हवे, काहीतरी मिळावे म्हणून देवाला याप्रकारे मस्का मारला जातो. असेच भिकाऱ्यासारखे हात पसरत माणूस सारखे काही ना काही मागत राहतो. गाडी, बंगला, चांगली नोकरी... ही यादी संपत नाही. मात्र भीक मागण्यात आयुष्य संपून जाते. आपले कुटुंब, ऑफिसमधील सहकारी, मुले, मित्रपरिवार, नातेवाईक, ग्राहक यांच्या मनाचा, विचारांचा, गरजांचा विचार करायला वेळच उरत नाही. दगडासमोर डोकं टेकण्यात तल्लीन झालेला मनुष्य जिवंत जीवांना विसरून जातो. अशाने देव अजिबात खूश होत नाही. दुसऱ्यांची मने दुखवणाऱ्यांवर देव खूष होईल तरी कसा! घरातल्या देव्हाऱ्यातल्या देवासमोर उभे राहायला दोन मिनिटं नसणारे लालबागच्या राजासमोर सात तास रांगा लावतात. याला भक्ती म्हणत नाहीत. स्वामी विवेकानंदांनी म्हटले तेच खरे - मनुष्यसेवा ही खरी देवपूजा आहे.
आपल्या अवतीभोवती असलेल्यांची मने सांभाळा, सर्वांशी प्रेमाने वागा, जगावर थोडा विश्वास ठेवा. ही खरी पूजा. चार वाईट लोक भेटले की सगळेच वाईट दिसू लागतात. दोन दु:खद प्रसंग घडले की, नशीब खोटे वाटू लागते. नजर जाईल तिथे खोटेपणा, लबाडी आणि त्रास पाहण्याची सवय होते. मनात कपट, द्वेष, शंका आणि लबाडी ठेवून केलेली पूजा ही पूजा नसून वेडेपणाच आहे. स्वच्छ, शांत आणि प्रेमळ मन हा भक्तीचा पाया, बाकी सगळे नंतर. इमारतीचा चाळीसावा माळा कुणालाही भावेल, पण त्यासाठी पायाही मजबूत हवाच ना. पूजा, उपास, नवस वगैरे आयुष्याच्या इमारतीतला चाळीसावा माळा आहे. अत्यंत देखणा आहे, पण स्वशुद्धीचा पाया आधी नीट बाधुन घ्या. वाईटाने माखलेले मन घेऊन कोणत्याही देवळात गेलात, कितीही उपास केलेत किंवा कोणताही नवस मागितलात तरी पदरी निराशाच येणार. बनवणाऱ्याला चालवता येते, देवाकडेकरप्शनहा प्रकार चालत नाही. तिथे लाच देऊन चांगले आयुष्य घेता येत नाही. तिथे चालते फक्त मनुष्यप्रेमाचे नाणे.
देवाने बनवलेल्या सृष्टिवर त्याने आकारलेल्या मनुष्यावर प्रेम करणाऱ्यांची इथे हुकुमत असते हे समजून घ्या. देव दगडाचा जरी दिसत असला तरी दगडाचे भक्त बनू नका?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद आपण दिलेल्या सूचनेला लवकरच प्रतिसाद दिला जाईल