Login

Login page

Simple Login Page

Username Password

शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१२


शतावरी
      
शतावरी ही एक काटेरी, आरोहिणी वेल आहे. हिची पाने बारीक असून सुरुच्या पानासारखी असतात. फाद्यावर साधारणपणे १ सें. मी. लाबीचे वाकदार काटे असून ते खालच्या बाजूस वाकलेले असताता. पाने २ ते ६ च्या संख्येच्या गुच्छात उगवणारे २ ते सें. मी. पर्यंत लांब असतात. फुले पांढन्या किंवा गुलाबी रंगाची असून गुच्छात येतात. फळ वाठाण्याच्या आकाराचे असून त्यामध्ये एक किंवा दोन बिया मिन्यच्या आकाराच्या असतात. झाडाची मुळे जाड, लांबट गोल  असून दोन्ही टोकाकडे निमुळती असतात. यांनाच कंद असे म्हणतात. कंद पांढरे असतात व ते एका झाडाला १०० पर्यंत असू शकतात. यामुळेच या वनस्पतीला शतावरी असे नांव पडले आहे.

शतावरीला शास्त्रीय परिभाषेत Asparagus racemosus असे म्हणतात. ही वनस्पती Liliaceae या कुटुंबातील आहे. शतावरी बी मुळची भारतीय असून उष्ण व समशितोष्ण कटिबंधात समुद्र सपाटीपासून ४००० फूट उंचीपर्यत सर्व देशभर वाढतांना दिसते.

आपल्याकडे शतावरीचा आणखी एक प्रकार आहे.  त्याला भातीची शतावरी असे म्हणतात. यालाचा शास्त्रीय परिभाषेत Asparagus officinalis असे म्हणतात. अमेरिकेतील कँलिफोर्निया, फ्रांसमधील मिलील फोर्ट, चीनमधील तायवान, जपान वगैरे देशात अँस्परागस भाजी प्रचारात आहे. अँस्परागसची  लागवड पूर्वीपासून काशमीर, भुतान या थंड प्रदेशात प्रचलीत आहे. या भाजीचे कोवळे कोंब चवदार, आरोग्यवर्धक तर आहेतच याशिवाय त्यात भरपूर प्रमाणात व्हिटँमीन ए व सीस पोटँशियम, रायबोफ्लेवीन व थायमीन ही ओशधी तत्वे आहेत. या कोंबापासून चविष्ट असे सुप तयार केले जाते. मेरी वाँशिंग्टन ह्गा जातीची आपल्याकडे शिफारस केली जाते.

उपयोगः  
औशधी उपयोगी शतावरीच्या कंदामध्ये सँपोनीन, ग्लायकोसाईडस, फॉस्फरस, रायबोफ्लेवीन, थायमीन, पोटँशियम, कँलशियम व इतरही रासायनिक द्रव्ये आहेत. कंदाचा उपयोग पित्तप्रदर, ज्वर, धातुवृध्दी, मुतखडा,, अपस्मार रक्तशुध्दी यासाठी केला जातो. स्त्रियांसाठी शतावरी इतके दुसरे उत्तम औषध नाही. कंदाचा उपयोग जनावरांमध्ये विशेषतः गायी, म्हशी मध्ये जास्त दूध देण्यासाठी केला जातो. शोभेचे झाड म्हणून सुध्दा शतावरी घरोघरी लावलेली दिसते. शतावरी कल्प शतावरीच्या कंदापासून बनविला जातो. हा कल्प दुधातून नियमीत घेतल्यास रोग प्रतिकारक शक्ती वाढते. तसचे शतावरीपासून तयार केलेले नारायण तेल अर्धांगवायू व संधीवातावक गुणकारी आहे. शतावरी वाढलेला रक्तदाब कमी करीत असल्याने हृदय रोगात वापरतात. तसेच ही स्मृतीवर्धक कार्य करते. स्त्रियांमध्ये सुलभ प्रसूतीसाठी हिचा वापर केला जातो.

आधार: शेती फायद्याची औषधी सुगंधी वनस्पती-(फेब्रुवारी-२००५), डाँपंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद आपण दिलेल्या सूचनेला लवकरच प्रतिसाद दिला जाईल