पिंपळ
लॅटिन नाव - Ficus religiosa (फायकस रिलिजिओसा)
इंग्रजी नाव - बो ट्री, पीपल ट्री
भारतीय नावे - जारी (गुजराथी), अश्वत्थ, बोधद्रुम (संस्कृत), अवसाई/आरासू (मल्याळी)
कुल - वट कुल
कुळकथा - फायकस म्हणजे अंजीरवर्गीय, रिलिजिओसा म्हणजे पूजनीय. 'अश्वत्थ' या संस्कृत शब्दाचा अर्थ घोड्यासारखा उभा राहणारा. बोधद्रुम म्हणजे ज्या ठिकाणी माणसाला शाश्वत सत्य उमगते, ती जागा. पिपळ नावाचा उगम वेगळाच आहे. पॉप्लरवृक्षांच्या पानांचीही सळसळ होते. आर्य भारतात आले तेव्हा पिंपळाला पाहून त्यांना उत्तरेच्या प्रदेशाची आठवण झाली. पॉप्लरासारखा म्हणून त्याचे नाव पॅप्पल्-पिंपळ झाले. इटलीमध्ये आजही लागवड केलेल्या पिंपळाला भारतीय पॉप्लर किंवा पॉप्युलो डेले इंडी म्हणतात. भारतीय वनश्री ग्रंथात अगदी प्रारंभीच्या वर्गात पिंपळाचे वर्णन पॉप्लरासारखी पाने असलेल्या अंजीरवृक्षासारखा वृक्ष म्हणतात.
पिंपळ, वड, उंबर हा भारतीयांच्या दृष्टीने धार्मिक महत्त्व असलेल्या वृक्षांचा संच. पिंपळाच्या तर नावातच धर्म. पिंपळ वृक्षात तारुण्य आणि प्रौढत्व यांचे एक अजब मिश्रण आढळते. हा एक विशालकाय वृक्ष. त्याची साल फिकट राखाडी आणि गुळगुळीत असते, तशीच खवल्या-खवल्यांचीही असते.
कोवळ्या फांद्या मृदू, चकचकीत असतात. पाने तर पिंपळाचे वैभव. ह्रदयाकृती निमुळत्या, लांबलचक पानांचा देठही लांबसडक असतो. कोवळी पाने लालचुटूक, गुळगुळीत आणि चिवट असतात. वार्याच्या लहानशा झुळकीनेही ती 'बोलू' लागतात. पिंपळपानांची सळसळ हा निसर्गसंगीतातला एक मनोहारी राग. पिंपळपानाची थोरवी महान. श्रीकृष्णाला जोजवणारं हे पान. प्रतिभावंत ज्ञानेश्वरांसाठी हा पिंपळ सोन्याचा होऊन सळसळतो.
फांदी आणि पान यांच्या बेचक्यात फुलांचे पेले येतात. हे पेले जोडीने येतात. या पेल्यांत येणारी फुले अगदीच बारीक, बिनरंगी असतात. कच्चे फळ हिरवे, तर पिकलेले फळ जांभुळके असते. पक्षी, वाघुळे या फळांसाठी पिंपळावर वस्ती करून राहतात. पिंपळाचा पाला उंट आणि हत्तींचे आवडते खाद्य आहे. सालींत टॅनिन असते आणि काही वेळा कातडे रंगवायला ते वापरतात. त्यापासून तांबडा रंगही बनवतात.
पिंपळाची साल, पाने, फळे प्रत्येकाचं आयुर्वेदाच्या दृष्टीने औषधी महत्त्व आहे. वात, रक्तविकार, गर्भस्थापनेसाठी या फळांचं चूर्ण देतात. जेथे बीज पडेल, तेथे वृक्ष उत्पन्न करणारा हा पिंपळ म्हणून हे महत्त्व असावे. भिंतीच्या फटींतून उगवलेली पिंपळाची रोपटी याचे पुरावे आहेत. धार्मिक अधिष्ठान असल्यामुळे पिंपळ कधीच तोडला जात नाही. त्यामुळे आपोआप त्याचे संवर्धन आणि संरक्षण होत असते.
वैदिक काळामध्ये चकमकीचा वापर करून विस्तव तयार करण्यासाठी या झाडाचे लाकूड वापरत असत. या काळात चित्राद्वारा ग्रथित केलेले पहिले झाड पिंपळ हेच आहे. हिंदू धर्मातील त्रिमूर्तींशी पिंपळाचा संबंध आहे. पिंपळाची मुळे म्हणजे ब्रह्मदेव, त्याचे खोड म्हणजे विष्णू आणि त्याचे प्रत्येक पान म्हणजे एकेका दैवताची वास्तव्याची जागा आहे, असे अश्वत्थस्तोत्रामध्ये म्हटले आहे. एका दंतकथेत असे वर्णिले आहे, की विष्णूचा जन्म पिंपळाच्या वृक्षाखाली झाला. दुसर्या एका दंतकथेत म्हटले आहे, की एकदा शंकर-पार्वती खेळ खेळत असताना इतर देव तिथे आले. पार्वतीला राग आला. तिने त्यांना शाप दिला, की ते सर्व पृथ्वीवर झाडांचा जन्म घेतील. ब्रह्मदेव पळस वृक्ष झाला, रुद्र अंजीरसदृश झाड झाला आणि विष्णू पिंपळ झाला.
पिंपळ हे झाड 'ब्राह्मण' वृक्ष समजले जाते आणि ब्राह्मण त्याच्याखाली बसून प्रार्थना करतात. त्याला ते जानवेही घालतात. पिंपळ तोडला, तर ब्राह्मणकुटुंबाचा वध केला असे मानले जाते आणि तसे करणाराही लवकरच मरण पावतो असे समजतात. पिंपळाचा विवाह पुष्कळदा केळी किंवा लिंबू या झाडांशी भारतातल्या अनेक जमातींमध्ये लावण्यात येतो. अशी दोन झाडे एकत्र वाढत असली, तर त्यांना पती-पत्नी समजून एकांत दिला जातो. बोधगया येथील एका पिंपळाखालीच राजपुत्र सिद्धार्थाला साक्षात्कार झाला आणि तो 'बुद्ध' झाला असे म्हणतात. चिनी प्रवासी ह्युएनसंग याने त्यावेळी या वृक्षाबद्दल माहिती लिहून ठेवली आहे. गौतम बुद्ध हयात असताना हा वृक्ष शेकडो फूट उंच होता, असे तो म्हणतो. या वृक्षाची पाने सबंध वर्षभर तजेलदार हिरवी असतात, पण बुद्धनिर्वाणाच्या दिवशी मात्र ती सुकलेली व निर्जीव दिसल्याचे वर्णन असंख्य प्रवाशांनी लिहून ठेवले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद आपण दिलेल्या सूचनेला लवकरच प्रतिसाद दिला जाईल