सोनामुखी
सोनामुखी हे एक बहुवर्षीय झुडूप असून साधारणपणे ७५ ते १०० सें. मी. पर्यंत वाढते. सोनामुखीचे खोड सरल वाढून त्याच्या पानाचा आकार किंचित मोठा व फुलाचा रंग पिवळा असतो.
सोनामुखूला शास्त्रीय परिभाषेत Cassia angustifolia असे म्हणतात. ही वनस्पती Leguminoceae या कुंटुंबातील असून तिचे उगमस्थान सौदी अलेबिया आहे. भारतात तामिलनाडू, आंध्रप्रदेश, महाराष्ट, कर्नाटक इ. राज्यात सोनामुखीची लागवड जास्त प्रमाणात करण्यात येत होती. परंतु अलीकडील काळात गुजरात व राजस्थान या राज्यमध्ये सर्वात जास्त उत्पत्न घेतले जाते. या वनस्पतीचे भारतामध्ये सर्वात जास्त उत्पत्न घेतले जाते. जर्मनी, जापान, अमेरिका, इंग्लड, इटली, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया व इतर ४० देशांमध्ये निर्यात केली जाते व त्यापासून वार्षिक १५ कोटी रुपयाचे विदेशी चलन मिळते.
औषधी उपयोगः
औषधीकरिता प्रामुख्याने सोनामुखूंच्या वाळलेल्या पानांचा उपयोग करतात. पानांमध्ये सोनोसाईडस् हे महत्वाचे औषधी घटक आहे. पानाप्रमाणेच शेंगाचा सुध्दा औषधीकरीता उपयोग होतो. सोनामुखीचा स्वाद कडवट, चिकट व उत्तेजक असतो. हे एक रेचक म्हणून उपयागात अणतात. पोटाच्या सर्व विकारावर याचा उपयोग होतो. पचनशक्ती वाढविणे, भूक वाढविणे, शौचास साफ होण्याकरिता व चेहन्यावरील मुरुम तसेच मोठया पेशीमधील वायृ दूर करण्यासाठी सुध्दा याचा उपयोग होतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद आपण दिलेल्या सूचनेला लवकरच प्रतिसाद दिला जाईल