सर्पगंधा (Rauwolfia serpentina)
भारतात बऱ्याच ठिकाणी या झाडास सर्पगंधा या नावाने ओळखली जाते. काही ठिकाणी शास्त्रीय नावावरून राउवोल्फिया या नावानेपण ओळखतात. हे शास्त्रीय नाव जर्मन वनस्पती तज्ञ आणि वैद्य लिओनाई राउवोल्फ यांच्या नावावरून देण्यात आले आहे.
वर्णन
३०-७५ सेमी. उंच ताठ सरळ गुळगुळीत क्षुप, पाने मंडलाकार, ८-२० सेमी. लांब निमुळते होत पर्णवृतांत सांमीलित होणारी, फुले सुमारे १.५ सेमी. लांब दले पांढरी किंवा फिकट गुलाबी, पुष्पबंधाक्ष गर्द लाल, लहान गुच्छांमध्ये, फळे लहान गोल, पक्व झाल्यावर गर्द जांभळी किंवा काळपट.
वितरण
१०० मीटर उंचीवर हे झाड भारतात सर्वत्र सापडते. हिमालयाच्या पायथ्याशी, पुर्व आणि पश्चिम घाटाच्या कमी उंचीच्या पर्वत रांगामध्ये हे झाड सर्वसामान्यपणे सापडते. ते बंगाल, बिहार, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्राच्या अनेक मैदानी सपाट जागेवरूनही गोळा करण्यात आलेले आहे. सध्या हे झाड अनेक जागी लावण्यात येते.
औषधी गुणधर्म
सालीसह वाढवलेली मुळे या झाडापासून मिळणारे औषध आहे, मात्र ती शक्यतो ३-४ वर्षाच्या झाडांपासून हिवाळ्यात जमा करण्यात आलेली असावीत. राउवोल्फिया, भारतीय औषधात ४००० वर्षापुर्वीपासून माहीत होते असे समजण्यात येते. चरकाच्या ग्रंथात याचा उल्लेख आढळतो. या झाडाच्या मुळात अनेक ऍल्कलॉइडस असतात या औषधाचा मुख्य उपयोग उपशामक म्हणून निद्रेसाठी आणि रक्तदाब कमी करण्यासाठी होतो. सध्या या औषधाचा उपयोग मनोविकारात आणि उच्च रक्तदाबात मोठया प्रमाणावर होतो. उपशामकतेस या औषधाने वेळ लागतो म्हणुन तीव्र त्रास असलेल्या रूग्णांसाठी हे फारसे उपयोगी नाही. प्राथमिक व सौम्य अवस्थेत असलेल्या रूग्णांसाठी किंवा जुन्या मानसिक विकारावर ते अतिशय योग्य औषध आहे. या औषधात मन शांत स्थिर ठेवण्याचा गुणधर्म आहे. श्वासनलिका सुजलेल्या, दम्याच्या व जठरात क्षत असलेल्या रूग्णांना हे औषध देण्यात येऊ नये.
या झाडांची मुळे उदराच्या रोगावर आणि ज्वरात सुध्दा उपयोगी आहेत. सर्पगंधा या प्रजातीच्या इतर जातीही (टेट्राफिला L. syn रा. कॅनसेनस L) औषधी म्हणून उपयोगी आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद आपण दिलेल्या सूचनेला लवकरच प्रतिसाद दिला जाईल