शाल्मली
लॅटिन नाव - Bombax malabaricum (बाँबॅक्स मलबारिकम)
इंग्रजी नाव - रेड सिल्क कॉटन ट्री
भारतीय नवे - रक्तशिमुल (गुजराथी), सेमुल (हिंदी), यमद्रुम, शाल्मली (संस्कृत), इलावम, पुलाई( तमीळ).
कुल - शाल्मली
कुळकथा - बाँबॅक्स या नावाचे मूळ ग्रीक आहे. त्याचा अर्थ रेशमाचा किडा, मलबारिकम नावामुळे मलबार हे या वृक्षाचे मूळ स्थान असल्याचे सूचित होते. महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणावर जंगलांत, तसेच नागरी भागांत हा वृक्ष आढळतो. शाल्मलीचा वृक्ष महाकाय, पानगळीच्या जातीचा असून त्याची वाढ जोमाने होते आणि तो अनेक वर्षे जगतो. त्याच्या शाखा नियमित मंडले तयार करतात. त्या विस्ताराने पसरतात. एखाद्याने बाहू पसरावेत, तसा त्याचा आकार दिसतो. खरं म्हणजे संपूर्ण झाडाचा पसारा म्हणजे उपडे ठेवलेले शमादानच वाटते. कोवळ्या झाडाची साल हिरवी असते. तिच्यावर असंख्य टोकदार काटे असतात. झाड जुने झाले, की ती फिकट राखाडी होते. पाने हाताच्या पंजासारखी, संयुक्त प्रकाराची असतात. प्रत्येक पर्णिका भालाकृती आहे. फुले येण्यापूर्वीच सर्व पाने गळून पडतात.
बहुदा फुलांचा रंग लालभडक असतो. पण ती काळपट लाल, भगवी पिवळी किंवा फिकट जांभळीही असू शकतात. फुले फांद्यांना चिकटून वाढतात. ती अतिशय मोठाली, काहीशी मांसल, आणि सर्वांगावर मऊ लव ल्यालेली असतात.
फळ लांबट असते. काळपट तपकिरी बिया कापसासारख्या मऊ धाग्यांच्या वेष्टनांत असतात. फळ तडकले, की बिया रानोमाळ पसरतात.
या वृक्षाचा प्रत्येक भाग उपयोगी आहे. लाकडापासून आगकाड्या आणि पेट्या बनवल्या जातात. लाकूड अतिशय हलके असल्याने पाण्यावर तरंगते, म्हणून त्याचे ओंडके मासेमारीच्या जाळ्याला बांधतात. बियांपासून कापूस मिळतो. या झाडाच्या डिंकाला मोचरस म्हणतात आणि तो जखमा भरून येण्यासाठी आदिवासी लोक नेहमी वापरतात. कोवळी फुले उकडून खाल्ली जातात.
असे म्हणतात, की प्रजापती ब्रह्मदेव चराचर सृष्टी निर्माण केल्यावर दमून याच शाल्मलीवृक्षाखाली विसावा घेण्यासाठी पडून राहिला. महादेवाला या वृक्षाची फुले फार आवडतात. ही फुले कपाच्या आकाराची असतात. यांना जेव्हा बहर येतो, तेव्हा धनाची देवता असलेल्या लक्ष्मीशी त्यांची तुलना करतात. श्रीलक्ष्मी देवी दोन्ही हात लांब करून आणि तळहातांवर प्रज्वलित दीप धारण करून उभी असावी, असे या वृक्षाचे स्वरूप दिसते.
संस्कृत भाषेत या वृक्षाला यमद्रुम म्हणजे पाताळातला वृक्ष म्हणतात. कारण हा जरी फुलांमुळे सुशोभित दिसत असला, तरी त्याची फळे खाण्यास योग्य नसतात. सात नरकांपैकी एका नरकामध्ये पापी माणसाला टोचून त्याला छळण्यासाठी या वृक्षाचे काटे वापरतात असे महाभारतात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद आपण दिलेल्या सूचनेला लवकरच प्रतिसाद दिला जाईल