तुळशी (Oscimum sanctum)
वितरण
हे झाड भारतात सगळीकडे, घरांमध्ये, बागामध्ये आणि मंदिरामध्ये लावले जाते. बऱ्याच जागी ते जंगली स्वरूपातही उगवते.
औषधी गुणधर्म
या झाडाची पाने आणि बिया औषधी आहेत. पानांपासून काढलेल्या तेलात जीवाणू व कीटाणू नष्ट करण्याचा गुणधर्म आहे. पानांचा काढा किंवा रस फुफ्फूसाच्या नळ्या सुजण्यावर, पडशावर, पचनाच्या विकारात उपयोगी आहे. ते त्वचारोगावर व नायट्याच्या जागी लावण्यात येते. पानाच्या रसाचे थेंब कर्णशूल थांबविण्यासाठी कानात टाकण्यात येतात. पानांचा काढा घरगुती उपाय म्हणून सर्दी पडशासाठी नेहमी वापरण्यात येतो. बिया मूत्र उत्सर्जन संस्थेच्या रोगावंर उपयोगी आहेत. मलेरियाच्या ज्वरात घाम येण्यासाठी तुळशीच्या मुळांचा काढा देण्यात येतो.
तुळशी
हे भारतीयांचे प्रसिध्द आणि पवित्र झाड आहे. ती बहुशाखीय ताठ - सरळ, ७५ सेमी. पर्यंत वाढणारी औषधी आहे, सर्व अवयव केसयुक्त, पाने संमुख, सुमारे ५ सेमी. लांब, कडा दातेरी किंवा साध्या, वरच्या व खालच्या पृष्ठभागावर केंसाळ, बारिक ग्रंथीच्या ठिपक्यांनीयुक्त, सुवासिक, फुले लहान, जांभळट किंवा तांबुसआरक्त, लहान दाट, गुच्छ, सडपातळ कणिसात, फळे लहान बिया पिवळसर किंवा तांबूस-आरक्त. वितरण
हे झाड भारतात सगळीकडे, घरांमध्ये, बागामध्ये आणि मंदिरामध्ये लावले जाते. बऱ्याच जागी ते जंगली स्वरूपातही उगवते.
औषधी गुणधर्म
या झाडाची पाने आणि बिया औषधी आहेत. पानांपासून काढलेल्या तेलात जीवाणू व कीटाणू नष्ट करण्याचा गुणधर्म आहे. पानांचा काढा किंवा रस फुफ्फूसाच्या नळ्या सुजण्यावर, पडशावर, पचनाच्या विकारात उपयोगी आहे. ते त्वचारोगावर व नायट्याच्या जागी लावण्यात येते. पानाच्या रसाचे थेंब कर्णशूल थांबविण्यासाठी कानात टाकण्यात येतात. पानांचा काढा घरगुती उपाय म्हणून सर्दी पडशासाठी नेहमी वापरण्यात येतो. बिया मूत्र उत्सर्जन संस्थेच्या रोगावंर उपयोगी आहेत. मलेरियाच्या ज्वरात घाम येण्यासाठी तुळशीच्या मुळांचा काढा देण्यात येतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद आपण दिलेल्या सूचनेला लवकरच प्रतिसाद दिला जाईल